नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर राउज एव्हेन्यू न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली आहे. संजय सिंह यांना या सुनावणीदरम्यान जामीन नाकारण्यात आला आहे. संजय सिंह यांनी 24 नोव्हेंबर रोजी जामीन याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याप्रकरणी ईडीला नोटीस जारी केली आहे. संजय सिंह यांच्या याचिकेवर आता 6 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आप खासदार मागील 56 दिवसांपासून तुरुंगात आहेत. ईडीने त्यांना 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती.









