Sanjay Shirsat : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. यात अजित पवारांना फोकस करण्यात आलं आहे. अजितदादा नॉट रीचेबल होणं नवीन नाही. असे प्रकार अनेकवेळा जेव्हा घडले तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घटना घडते. पण अजित पवार भाजपमध्ये जाणार नाहीत. कोर्टातली केस आणि अजितदादांची नाराजी याचा काही संबंध नाही.पार्थ पवारांच्या पराभवापासूनच दादा नाराज आहेत.नाराजीचा हा सगळा खेळ सुरु आहे.याचा अर्थ ते भाजपमध्ये येणार असं नाही. अजितदादा अस सहजासहजी काहीही करणार नाहीत अस स्पष्टीकऱण शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, अजित पवार हे टायमिंग साधणारे नेते आहेत. त्यांच्या मनात काय चाललय याचा अंदाज सहजा-सहजी कोणीच बांधू शकणार नाही. मात्र एक गोष्ट मला येथे मुद्दामून सांगावीशी वाटते ती म्हणजे, मविआच्या सभांमध्ये अजितदादांचं स्थान शोधावं लागतंय.नागपूरच्या सभेत त्य़ांना बोलू दिलं नाही. त्यांना केवळ मोहरा बनवलं जातयं, हा अजित पवारांचा अपमान असल्याचे शिरसाट म्हणाले.
यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले धनंजय मुंडेंनी मला सांगितल की, अजितदादांची नाराजी दाटून आली आहे.धनंजय मुंडे यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांची भेट होत नाही अशी नाराजी अजित पवार यांना बोलून दाखवली तेव्हा दादा म्हणाले, मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा देखील माझे देखील फोन ठाकरे घेत नव्हते. तु तर मंत्री आहेस.म्हणनूच कदाचित अजितदादा वेगळा पर्याय शोधत आहेत.
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, आघाडी सत्तेपुरती होती. आता सत्ता नाही त्यामुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. आपसातील बेबनावामुळे आघाडीची बिघाडी होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच अजितदादांना राष्ट्रवादीत राहायचं नाही. जर दादांनी राष्ट्रवादी सोडली तर आम्ही त्यांच स्वागत करू. पण राष्ट्रवादी भाजपमध्ये जातेय हा समज चुकीचा आहे असही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








