एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी पहिल्या दिवसांपासून विश्वासाने होतो. शिंदे यांच्या नेतृत्वार असलेला माझा विश्वास, त्यांची काम करण्याची पद्धत, भविष्यात कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची ताकद शिंदे यांच्यामध्ये आहे म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज आहे, कुठेतरी सोडून चाललो, पळून चाललो असं काही होणार नाही. सर्व आमदार आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी दिली. शिरसाट नाराज असलेल्या चर्चा सुरु आहेत. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक आमदाराला आपले नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात असावे, असे वाटत असते. प्रत्येकाला वाटतं की कधी ना कधी संधी मिळावी. संधी मिळाली नाही म्हणून नाराज आहे, असे प्रत्येक आमदार मनाशी ठरवायला लागले तर सर्वांनाच मंत्री करावे लागेल. आमच्याकडे (शिंदे गट) तर पन्नास लोक आहेत. त्यातील नऊ जणांनाच संधी मिळणार होती. उठावात जे आमच्याबरोबर होते, ज्यांनी आम्हाला साथ दिली आणि आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढले. त्यांना पसंती द्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांचे म्हणणे होते असेही ते म्हणाले.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








