ऑनलाईन टीम/तरुण भारत
Sanjay Raut Bail : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांना १०० दिवसानंतर अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज राऊतांना मुंबईतील पीएमएलए कोर्टानं (PMLA Court) जामीन मंजुर केला. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडलेल्या ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीनं संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. पण न्यायालयाने याचिकांना फेटाळून लावत राऊतांना दिलेला जामीन कायम ठेवला आहे. त्यानंतर आता जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जामीन कायम ठेवण्याचा निकाल कोर्टानं दिल्यानंतर संजय राऊतांनी ‘आता मी पुन्हा लढेन’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. जामीन मंजुर झाल्याचं समजताच संजय राऊतांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर त्यांनी ‘मी न्यायदेवतेचे आभार मानतो, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता की मला न्याय मिळेल, आता मी पुन्हा लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुनावणीवेळी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ कोर्टात उपस्थित होते. त्यावेळी डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.