ऑनलाईन टीम/तरुण भारत
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या संजय राऊतांना अखेर आज मुंबईतील पीएमएलए कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. दरम्यानच्या काळात संजय राऊतांकडून (Sanjay Raut) अनेकदा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक वेळी पीएमएलए न्यायालयाकडून राऊतांचा अर्ज फेटाळून लावला होता. अखेर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. तर तुरुंगाबाहेर येताच संजय राऊतांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिलीय.
दरम्यान, संजय राऊतांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “तुरुंगातून सुटल्याचा मला आनंद आहे. यामुळे न्यायालयावरील विश्वास वाढला. माझी प्रकृती जरा बरी नाही. मी प्रसारमाध्यमांशी यावर सविस्तर बोलणार आहे. न्यायालयानेच माझी अटक बेकायदेशीर असल्याचे सांगितले. आम्ही लढणारे आहोत, लढत राहू. कार्यकर्त्यांनी पुढील कार्यक्रम ठरवाला आहे” अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.








