ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन खा. संजय राऊत यांनी गोऱ्हेंवर निशाणा साधला. काही महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात राऊत यांनी गोऱ्हेंवर टीकास्त्र डागले.
संजय राऊत पंढरपुरात माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्यांना 5 वेळा शिवसेनेने आमदार केले. त्यांना मिळालेले वैधानिक पद हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले. 4 ते 5 महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. त्यामुळे अशा लोकांची आम्हालाच लाज वाटते. अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊतांचा तोल सुटला.
दरम्यान, राज्याची ओळख संतांची भूमी नसून आता गद्दारांची भूमी म्हणून होत आहे. त्यामुळे ही ओळख पुसण्याची पांडुरंग शक्ती देवो. हुकूमशाही, दडपशाही, पैशाचे राजकारण सुरू आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे. महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनातील साकडे घालायला मी पंढरपुरात आल्याचे त्यांनी सांगितले.








