मुंबई , प्रतिनिधी
बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. त्या अर्थी ती लोक त्यांचीच असू शकतात, कार्यकर्ते असू शकतात, आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या हे सांगण्यासाठी फोन केला.’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सोलापूरमधील माढा तालुक्यात झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संभाषण व्हायरल झाल्यानंतर संजय राऊतांनी यावरून टीकास्त्र डागले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यात झालेल्या संभाषणानंतर राऊत यांनी अजित पवारांच्या कारभाराबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. संजय राऊत म्हणाले की, अजित पवार नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात की ते कोणतेही नियमबाह्य काम करत नाहीत. “जर नियम बसत नसेल तर मी हो म्हणत नाही,“ असे ते म्हणतात. पण त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण मिळावं, कारवाई होऊ नये यासाठी ते थेट अधिक्रायांशीश वाद घालत होते.
याला तणाव म्हणत नाहीत तर दादागिरी म्हणतात. मी अजित पवारांना म्हणत नाही, पण सध्याचे सरकार जवळजवळ अर्धे मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देते. आम्ही अजित पवारांना गुन्हेगार ठरवत नाही, पण त्यांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, ज्या पद्धतीने लोकांना ज्ञान देताना जे बोलत असतात, त्यात त्यांचेही पाय मातीचे आहेत.अशी बोचरी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली.
राऊत म्हणाले, “पहिली धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी म्हणजे, जर तुम्ही आमच्या नेत्याबद्दल काही बोलाल, तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. अस त्या आमदाराने पत्रातून स्पष्ट होतयं. एका महिला अधिक्रायाने केवळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो, हे सांगितले, जो त्यांच्या कामाचा भाग होता. यावरून त्या आमदाराने युपीएससीला लिहीलेल्या पत्रात संबंधित महिला अधिक्रायाची चौकशी करण्यास सांगितले आहे. पण आयएएस, आयपीएस आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रत्येक अधिक्रायाचे काम म्हणजे जर मंत्री किंवा राज्यकर्ते चुकत असतील, तर त्यांना नियम काय आहे, संविधान काय आहे हे दाखवणे. त्या महिला अधिक्रायाचं काय चुकलं?“ असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.
तर 90 टक्के मंत्रीमंडळ खाली होईल
नैतिकतेचा मुद्दा असेल आणि महाराष्ट्रात नैतिकता पाळायची म्हटलं तर महाराष्ट्रातील 90ज्ञ् मंत्रिमंडळ खाली होईल, शिंदे गटाचे सगळे मंत्री घरी जातील नैतिक त्याच्या मुद्यावर अजित पवारांचे सर्व मंत्री घरी जातील, प्रत्येकावर आरोप आणि गुन्हे आहेत.प्रत्येक जण आजही सरकारमध्ये बसून बेकायदेशीर काम करत आहे कालची तर गोष्ट सोडून द्या नैतिकेच्या मुद्यावर करायचं म्हटलं तर निम्म मंत्रिमंडळ हे 24 तासात घरी जायला पाहिजे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.









