प्रतिनिधी/ मुंबई
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांनी काही दिवसापूर्वी आपल्याला गंभीर आजाराचे निदान झाल्याचे सांगत सोशल मीडियावऊन माहिती दिली होती, मात्र आता त्यांची प्रकृती आणखी बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खराब प्रकृतीमुळे संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. अशातच आता संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आज आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांती घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.








