ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ केसमध्ये खा. संजय राऊत यांच्यावर आरोप निश्चिती झालेली आहे. त्यामुळे ते काही दिवसांचे पाहुणे आहेत. पुढील तीन महिन्यात ते पुन्हा तुरूंगात जातील, असा दावा भाजप आ. नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 16 आमदारांच्या अपात्रतेवरुन संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांना त्यांनी तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. अशा धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही. धमकी देण्याचे दिवस गेले. नियमांत, कायद्याच्या चौकटीत आहे तेच नार्वेकर करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तीन महिन्यांतच निर्णय घ्या असे आदेश आलेले नाहीत. कायद्याच्या अनुसारांतच निर्णय घेतले, तुम्हाला काय करायचं ते करा, असे आव्हानही त्यांनी राऊतांना दिले.
दरम्यान, राऊत हे पुढील तीन महिन्यात पुन्हा तुरूंगात जातात की नाही ते पाहा, असेही ते म्हणाले.








