Kolhapur : राज्यात गायरान मधील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे. याला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टातून समिती नेमावी या मागणीसाठी आज शाहुवाडी तहसील कार्यालयावर ठाकरे गटाच्या शिवसेनेने मोर्चा काढला होता. या मोर्चात थेट खासदार संजय राऊत यांचा फोनवरून संपर्क शिवसैनिकांशी झाला. यावेळी बोलताना राऊत यांनी, पुन्हा कोल्हापूर उभा करूया, मी कोल्हापुरात येतो. माझ्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढू अशी ग्वाही संजय राऊत यांनी मोर्चातील शिवसैनिकांना दिली.
आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांच्या फोनवर खासदार संजय राऊत यांचा संपर्क झाला. यावेळी फोनवरूनच बोलताना राऊत यांनी शिवसैनिकांना प्रेरित केले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रत्येक आंदोलन यशस्वी होत आहे. कोल्हापूरने शिवसेनेला खूप काही दिलं आहे. मात्र कोल्हापूर पुन्हा उभं करण्यासाठी मी येत आहे. लवकरच कोल्हापुरात येऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करू अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









