शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज शिंदे गटाकडून एक मोठा धक्का बसलेला आहे. संजय राउत यांना संसदिय नेतेपदावरून (parliamentary leader) हटवण्यात येऊन त्याठीकाणी शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तिकर ( MP Gajanan Kirtikar) यांची निवड केली आहे.
यापुर्वीच मुंबईत झालेल्या शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची बैठकीत ही निवड करण्यात येऊन त्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून शिवसेना संसदिय नेतेपद संजय राऊत यांच्याकडून काढून घेतल्याचे कळवले होते. मुख्यमंत्र्यांचे हे पत्र खासदार राहूल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचवले.
संजय राउत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांची आता या पदावर वर्णी लागणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर शिवसेनेतील राजकीय घडामोडींना वेघ घेतला आहे.