धनुष्यबाण सेनेचाचं आहे आणि सेनेकडेचं राहिलं; नाशिकमध्ये राऊतांचं दावा
ऑनलाईन टीम/तरुण भारत
नाशिक: सेनेतील एक-दोन पळून गेले म्हणजे सेना संपली नाही. सेना आहे तिथेच आहे. आज मालेगाव, नांदगावमधील पदाधिऱ्यांशी माझं बोलणं झालं, भेट झाली. आज आणि उद्या दोन दिवस मी नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिक महानरगपालिकेवर सेनेची सत्ता येईल अशी तयारी मी केली आहे. नाशिक नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. नाशिक बाळासाहेबांच्या पाठीशी आहे. सेना नव्या ताकदीनं उभी राहिलं. धनुष्यबाण सेनेचा आहे आणि सेनेकडेचं राहिलं असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. संजय राऊत दोन नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या उत्तर बांधनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आज ते ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत आणि उद्या शहरी भागाचा. दरम्यान आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Sanjay Raut Visit In Nashik)
राज्यात सध्या कृत्रिम वादळ
यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात सध्या कृत्रिम वादळ सुरु आहे. हे वादळ लवकरचं निवळेल आणि नव्या दमाने शिवसेना पुढे गेलेली तुम्हाला दिसेल. बंडखोरांना पुन्हा विधानसभेत जाऊ देणार नाही. भाजपाला नविन ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून ते आता माझ्याविषयी बोलत नाहीत. सेनेसाठी आम्ही काय केलं आणि करतो हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही आजही बंडखोरांना आपले सहकारी मानतो. त्यांनी जी चार कारणं सांगितली ती पटण्यासारखी नाही. तुम्ही एकत्र बसवून कारण ठरवा आणि मग हिंदूत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
हेही वाचा- Kolhapur; महापालिका निवडणूक भाजप-शिंदेगट एकत्र लढवणार
रक्तपात होऊ देणार नाही
भाजपावर (BJP) टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, भाजपाला शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे. त्यांना महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. यासाठी ते सेना संपावयला निघाले आहेत. त्यांना मुंबईचे तुकडे करायचे आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, सेनेत भांडण लावून त्यांना रक्तपात घडवून आणायचा आहे. पण आम्ही तसं होऊ देणार नाही. आमच्याचं लोकांचां रक्तपात आम्ही होऊ देणार नाही. यातून नक्कीच मार्ग काढू असेही ते म्हणाले.
हेही वाचा- महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कामाला लागा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
राज्यपाल एकतर्फे निर्णय घेतात
राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत. त्यांनी एकतर्फे निर्णय घेतला. यातुन गुंडशाही फोपावली आहे. स्वत:ला शिवसैनिक म्हणवऱ्यांनी शिवसेना सोडावी. स्वत: तुम्ही निर्माण करुन दाखवा. जे आमदार गेलेत त्या सर्वांची मुले त्या-त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत. त्या मुलांकडे निर्णय क्षमता आहे असेही ते म्हणाले.