ऑनलाईन टिम मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भुमिका मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगेच ट्विट करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्याअगोदर कालच म्हणजे मंगळवारी संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्त करण्याचे संकेत दिले होते.
उद्धव ठाकरे बुधवारी राजीनामा देतील अशा चर्चा असतानाच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी तसेच ‘हिंदुत्वा’साठी जोरदार लढा देण्यासाठी कार्यकर्त्यांना साद घातली. त्यानंतर आज संजय राउत यांनी ‘होय, संघर्ष करणार’ अशा आशयाचे ट्वीट केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर लगेच त्यांनी हे ट्विट आपल्या ट्विटर हँडलवरून केले आहे. आपल्या या संदेशाबोबर त्यांनी शिवसेनेच्या चिन्ह धनुष्यबाणाचे चित्र टाकले आहे.









