राजेश लाटकर यांच्या निवासस्थानी माजी महापौरांसह माजी नगरसेवकांशी चर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात विविध नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे त्यांनी कोल्हापूर महापालिकेचे माजी महापौर, माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांच्या निवासस्थानी खासदार राऊत यांनी भेट दिली. लाटकर परिवाराच्या वतीने राष्ट्रसेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते भरत लाटकर, सौ. अंजली भरत लाटकर, माजी महापौर अँड. सुरमंजरी राजेश लाटकर यांनी करवीर निवासनी अंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले.
लाटकर यांच्या निवासस्थानी एस. एम. जोशी, बॅरिस्टर नाथ पै, साने गुरूजी यांचे फोटो पाहून भारावलेल्या खासदार राऊत यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते भरत लाटकर यांच्याकडून समाजवादी कालखंड, त्यावेळचे नेते, जनतेच्या प्रश्नावर झालेली आंदोलने या विषयी माहिती घेत आठवणी जागवल्या.
महापालिकेविषयी घेतली माहिती
कोल्हापूर महापालिकेवर गेली सव्वा दोन वर्षे प्रशासकराज आहे, महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात पहिल्यांदा कोल्हापूर महापालिकेत झाल होता, अशी माहिती राजेश लाटकर यांनी खासदार राऊतांना दिली. कोल्हापूर शहर आणि महापालिकेतील राजकीय स्थितीची माहिती घेत खासदार राऊत यांनी माजी पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. यावेळी माजी महापौर भीमराव पवार, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र डकरे, माजी नगरसेवक सर्वस्वी विनायक फाळके, तानाजी कुंभार, स्मिता माळी, प्रकाश कुंभार, रमेश पुरेकर, मोहन सालपे, सुभाष बुचडे, राजेंद्र साबळे, सागर येवलूजे, महेश उर्फ आण्णा बराले, महेश जाधव, बाबासाहेब ठोकळे, डॉ. काटकर, स्कूल बोर्ड सदस्य भरत रसाळे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, असीफ फरास, बिद्रीचे संचालक प्रविण भोसले, सतीश घाटगे, संजय चितारी, विशाल चव्हाण, भरत सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, &जिल्हा प्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.