२००८ मध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण होत आहेत, पण आजही ते भयानक दृश्य सर्वांना आठवते.आज अनेक राजकीय नेते मंडळींना सोशल मीडिया वर २६/ ११ च्या हल्ल्याबाबत पोस्ट शेअर करत श्रद्धांजली दिली आहे. संजय राऊतांनी देखील यावर वक्तव्य केलं आहे. आमच्या पोलिसांनी मुंबईला वाचवले.. दहशतवाद्यांनी मुंबई कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आणि आता काही राजकीय लोक तेच करत आहेत.त्याच्याकडे बंदुका आणि दारूगोळा नाही पण त्याला मुंबई कमकुवत करून तिचे महत्त्व कमी करायचे आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आजचा दिवस राजकीय वक्तव्यांचा नसून मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या लोक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या स्मरणाचा दिवस आहे.मुंबई आज सुरक्षित असेल पण काश्मीर आणि मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना जीव गमवावा लागत आहे. काश्मीर आणि मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक असून त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.असही राऊत म्हणाले आहेत.