ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खा. संजय राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेबद्दल आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल बोलू नये. ते आमचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी चोंबडेपणा करू नये, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले.
शरद पवारांच्या राजीनाम्यावर बोलताना राऊतांनी काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, मात्र निर्णय राहुल गांधींच घेतात, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा पटोलेंनी समाचार घेतला. संजय राऊत यांनी चोंबडेपणा थांबवावा. ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत. आमच्या पक्षाचे अध्ग्नयक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या क्षमतेबद्दल आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर त्यांनी भाष्य करू नये. दरम्यान, राष्ट्रवादी हा पक्ष शाहू-फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे ते भाजपसोबत जातील, असे वाटत नाही.
दरम्यान, शरद पवार यांच्या आत्मचरित्रात महाविकास आघाडी सरकार निर्माण होत असताना काँग्रेसच्या भूमिकेबद्दल जे आरोप करण्यात आले आहे. त्याबद्दल योग्य वेळी उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.








