Sanjay Raut on Kasba-Chinchwad Election Results : गेले 40 वर्ष शिवसेनेच्या मदतीने भाजप कसब्यात निवडणुकीत विजयी होत होता. आता शिवसेना महाविकास आघाडीचा एक घटक आहे. आम्ही सगळे एकत्र असल्याचा परिणाम दिसतो.शिवसेनेच्याच मदतीने भाजपचा विजय होत होता. मला खात्री आहे चिंचवडमध्ये देखील भाजपाला घाम फोडू,आम्हाला अपेक्षा आहे कि ती जागा आम्ही जिंकू. कसब्यातील भाजपचा गड कोसळणार असे सूचक वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केले. आज कोल्हापुरात ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.मतमोजणीला सुरुवात झालीय. या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.त्यामुळे आज मतपेट्यांमधून कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप,राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आहे.
Previous Articleसरकारी नोकर संघाचा आंदोलनास पाठिंबा
Next Article ब्रह्मनगर वसाहतीचे दूषित पाणी








