ऑनलाईन टीम / तरुण भारत :
समृद्धी महामार्गावर शुक्रवारी झालेल्या बस अपघातात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला. आतापर्यंत या महामार्गावर छोटय़ा-मोठ्या अपघातात शेकडो लोक दगावले आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार, कोणावर गुन्हे दाखल करणार? या सरकावरच समृद्धी महामार्गावरील अपघातांप्रकरणी गुन्हा का दाखल करु नये?, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, समृद्धी महामार्गावरील अपघात प्रकरणी सरकारने बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. काहीही झाले की तुम्ही बस चालकावर गुन्हे दाखल करता. पण आतापर्यंत छोटय़ा कारचे अपघात झाले. आतापर्यंत शेकडो लोक या महामार्गावरील अपघातात दगावले. त्याबाबत कोणावर गुन्हे दाखल करणार? देवेंद्र फडणवीस स्वत:वर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून घेणार आहेत का?
दरम्यान, अपघात रोखण्यासाठी संपूर्ण समृद्धी महामार्गाची एक तांत्रिक चाचणी करावी. अपघात कुठे होतात, का होत आहेत? हे पाहावे. समृद्धी महामार्ग तयार केला म्हणून फक्त त्याचे राजकीय भांडवल करू नका. गेल्या काही महिन्यात 300 पेक्षा जास्त अपघात या महामार्गावर झाले आहेत. कालचा अपघात भयंकर होता.