Sanjay Raut : धनुष्य नीट उचला, रावणाने देखील धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता हे जरा रामायणातून समजून घ्या.अशी डोंगर सोंग महाराष्ट्रात चालत नाहीत. त्यांच्या यात्रा म्हणजे सगळ्यात पैशांचा खेळ असतो. हक्कभंग समिती ही पक्षपाती आहे मूळ शिवसेनेचा एकही सदस्य त्यात घेतलेला नाही. ज्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांनाच न्यायाधीश करण्याचा प्रकार केलाय.कसब्यात त्यांचा पराभव झाला आहेच पण चिंचवडमध्ये त्यांचा विजय झाला हे मी मानायला तयार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
संदीप देशपांडेंवर मुश्किल टिपणी करताना ते म्हणाले, कोण आहेत ते ? कुठे राहतात ते ? कोणत्याही नागरिकांवर अशा प्रकारचे हल्ले होणं हे कायद्याने चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही.मी अजून नोटीस वाचली नाही माझ्या हातात अजून नोटीस पडलेली नाही. माझ्या हातात नोटीस असती तर मी इथून उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईत कायदेशीर बाबींना उत्तर देता येत नाही. मला कायद्याचा अभ्यास करावा लागेल, असेही ते म्हणाले.
या राज्यात सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर सुरू असल्यामुळे सरकारच बेकायदेशीरपणे बसलेला आहे. मी विधिमंडळाचा आणि आमदारांचा अपमान होईल असं मी काहीही म्हटलं नाही. एक विशिष्ट गट जो बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे असं सांगतो आहे त्या गटाबद्दल मी बोललेलो आहे. त्यामुळे हक्क बंग होतो की नाही हे पाहावं लागेल. आज उत्तर नाही दिलं तर मला फासावर लटकवणार आहात का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. लटकवा, तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा असा इशाराही त्यांनी दिला.
नागालँडमध्ये आठवले गटाला जागा मिळाल्या याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हे जगातला आश्चर्य आहे. महाराष्ट्रात जरी त्यांना जागा मिळाल्या नसल्या तरी नागालँडच्या भूमीवर त्यांना जागा मिळाल्या मी त्याचा अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.
Previous Articleवातावरण बदलाचा फटका; आरोग्याच्या तक्रारीत वाढ
Next Article उद्योग खात्रीतील योजना सुरू होणार कधी ?








