ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राज्यपालांना बरं वाटू द्या, मग संख्याबळाच बघू. एकनाथ शिंदेंचा बंड हा घरातला विषय आहे. ते सगळेच घरला परत येतील.आमदारांशी बोलणं सुरु आहे. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या सोबत आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्य़ांनी आम्हाला आम्ही त्यांना सोडण सोप नाही. राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा –राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण
पुढे बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याशी एक तास बोलण झाले असून, याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे. बाळासाहेब ठाकरे पासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचे काम केले आहे. या सगळ्यांना शिवसेनेसोबत राहायचे आहे. काही समज-गैरसमज आहेत ते दूर होतील. याचा अर्थ शिवसेनेत काहीतरी गडबड आहे असे कोणी वाटून घेऊ नये.
हेही वाचा – शिंदेंच्या गटाला यड्रावकर मिळाले
भाजपावर निशाणा साधताना ते म्हणाले, त्यांना वाटत असेल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे शिवसेना कोसळेल. पण शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. सेनेने राखेतून जन्म घेवून गरुड झेप घेतली आहे. हा ५६ वर्षाचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे हे आमचे जूने सहकारी आहेत. त्यांच्या सोबतची आमची चर्चा सकारात्मक सुरु आहे. त्यांची उध्दव ठाकरे, सेनेतील कोणत्याही नेत्यावर नाराजी नाही. ते कट्टर शिवसैनिक आहेत. शेवटपर्यंत ते सेनेतच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुका शिंदे सांगतात तशाच होतात. त्यांना कोणत्याही अटीशर्ती ठेवल्या नाहीत. समोर आलेल्या काही गोष्टी खूप वाढवून सांगितल्या जात आहेत. पण यातूनही मार्ग काढण्यात येईल. शिवसेना पाठीमागून वार करत नाही. आज सकाळी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. आज दिवसभरात मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटतील. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आम्ही संघर्ष करु. जास्तीत जास्त काय होईल महाराष्ट्रातून सत्ता जाईल. सत्ता परत आणता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे.
आमदारांच्या कोणत्याही मागण्या नसताना ते गुवाहाटीला का गेले आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर राऊत म्हणाले, गुवाहाटीमध्ये जंगल छान आहे. तेथे आमदार फिरतील, पर्यटन करतील. आमदारांनी देश फिरला पाहिजे यामुळे त्यांना देशाची ओळख होते. आमच्या त्यांना शुभेच्छा असेही ते म्हणाले.
Previous Articleशिंदेंच्या गटाला यड्रावकर मिळाले
Next Article आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना









