Patrachal Land Scam : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यत न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपली असून कोर्टात हजर करण्यात आले आहे. या तीन दिवसात ईडीने कागपत्रे गोळा करून अनेकांची चौकशी केली आहे. यामध्ये आलिबागमधील दहा भूखंडांसाठी संजय राऊतांनी ३ कोटी रोख दिले. ही रक्कम गुरुआशिष कन्स्ट्रक्शननं पुरवली आहे. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणात गुरुआशिष कन्स्ट्रक्शन मुख्य आरोपी असल्याचे ईडीने सांगितले. त्यामुळे संजय राऊतांना जामीन की ईडी कोठडीतला मुक्काम वाढणार? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राऊतांना कोर्टात घेवून जात असताना राऊतांना त्यांचे कुटुंबीय, शिवसैनिक भेटायला आले होते. यावेळी पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाली. कालच राऊतांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. आज ईडीचे वकिल पुन्हा राऊतांच्या कस्टडीची मागणी करणार आहेत. तर राऊतांना कस्टडी मिळू नये अशी मागणी राऊतांचे वकिल करणार आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एेकल्यानंतर कोर्ट काय आदेश देणार हे पाहावे लागणार आहे.
Previous Articleरोटरी क्लब आयोजित वक्तृत्व स्पर्धेत महाडीक महाविद्यालयाचे सुयश
Next Article सांगली जिल्हा परिषदमध्ये ६० जागांसाठी निवडणूक








