Sanjay Raut Patrachal Land Scam : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पुन्हा चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना ईडीने 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केलं असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ईडीने 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. पण संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. मात्र तरीही कोर्टाने 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
Previous ArticleKolhapur; ‘सीपीआर’ला हवीय ई-ऍम्ब्युलन्स.!
Next Article Kolhapur; महापौरपदासाठी ‘ओबीसी’ प्रभागात रस्सीखेच








