Sanjay Raut On Shivsena Symbol: निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चिन्हावरून वाद सुरु झाला आहे. दोन्ही गटाला उगवता सूर्य आणि त्रिशूळ हे चिन्ह हवं आहे. मात्र निवडणूक आयोगाने हे चिन्ह नाकारले आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर अनेकांनी प्रतीक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान पुनर्विकास प्रकल्प घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.त्यांच्या जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यावेळी कोर्टाच्या आवारात शिवसैनिक,माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांनी अनौपचारिक संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, खरी शिवसेना कोणती आहे,हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ.आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ असल्याचे त्यांनी सांगितले.या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही.नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्याशिवाय, पक्षाच्या नावांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








