Sanjay Raut On Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अयोध्या दौरा नसून ते शक्तीप्रदर्शन असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केली. या दौऱ्यात दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जादा होता. दर्शन आणि शक्तीप्रदर्शन यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. राम हे संयम आणि मर्यादेचं प्रतीक आहेत असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोक रस्त्यात मारतील याची शिवसेनेला भीती आहे. अयोध्या दौऱ्यात दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जादा होता. शक्तीप्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे ठाण्याचा नाका आहे की तेथे करा शक्तीप्रदर्शन, की तुमच्या गटातील लोकांना शुध्द करण्यासाठी घेऊन गेला होता असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच गद्दारांना लोकांनी पकडून रस्त्यावर मारलं पाहिजे, असा हल्लाबोलही केला.
शरद पवार यांच्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएमवर शरद पवारांचा विश्वास असेल, मात्र देशाचा नाही.ईव्हीएमवरून राष्ट्रवादी, ठाकरे गटात मतभिन्नता असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








