शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत शिवसंवाद यात्रेसाठी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. महाराजांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महाराजांना भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “छत्रपती शाहू महाराजांचा 75 वा वाढदिवस झाला त्यावेळेला उपस्थित राहू शकलो नाही म्हणून आता त्यांची भेट घेतली. महाराजांना भेटणं हे एक आनंदाचा क्षण आहे. महाराजांची आणि ठाकरे कौटुंबियांचे कौटुंबिक संबंध आहेत. शिवसेना सध्या संघर्षाच्या काळातून जात आहे त्यामुळे महाराजांकडून आशीर्वाद घेतले. या भेटीत आम्ही विविध विषयावर चर्चा केली” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
विधीमंडळात संजय राउत यांच्यावर हक्कभंगाची कारवाईची मागणी होत असल्याबद्दल ते म्हणाले, “हक्कभंग समितीला त्यांचा अभ्यास करू द्या. माझीही काही गरज लागली तर मी नक्कीच त्यांना मदत करेन. तसेच माझा अनुभव आणि अभ्यास त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवेन.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण आहे. बाकी सर्व मंदिरेही फक्त नावालाच राहीली आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे फार मोठ्या अपेक्षांनी पाहत आहोत. आम्हाला खात्री आहे निकालात आम्हाला न्याय मिळेल.”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








