Sanjay Raut granted bail after 100 days
गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना आज जामीन मंजूर केला.
सावंतवाडी / प्रतिनिधी









