Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामिन मंजूर झाला आहे. आज त्यांना कोर्टात हजर केले होते. विशेष पीएलएमए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. ईडीसाठी हा मोठा झटका आहे.संध्याकाळपर्यंत राऊत तुरुंगातून बाहेर येतील अशी माहिती समोर आली आहे. राऊतांना जामीन मिळताच शिवसेना युवानेत आदित्य ठाकरे य़ांनी प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत खरे शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांच नाव लावून फिरत नाहीत. खोटा मुखवटा लावत नाहीत. त्य़ांना दबावगिरी केली मात्र, त्यांनी गद्दारी केली नाही.ते पळून गेले नाहीत, ते भित्रे नाहीत हे आता जनतेसमोर आले आहे.जे कोणी सरकार विरोधात बोलतो त्यांच्यावर दबाव आणला जातो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.
संजय राऊत यांच्या जामिनीविरोधात ईडी हायकोर्टात जाणार आहे.ईडी उच्च न्यायालयात धाव घेणार.मात्र यावर न्यायाधीश एन.जी.देशपांडे यांनी नाराजी दर्शवली आहे. कोर्टाच्य़ा आदेशाला ईडी स्टे कशी आणू शकते अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








