शिवसेना नेते संजय राऊत यांच्या रिमांडसाठी आज कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ई़़डी कोठडी सुनावली. यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जेष्ठ वकिल अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांची बाजू मांडली. तर ईडीकडून हितेन वेणेगावकर यांनी युक्तीवाद मांडला. न्यायमूर्ती एम.जी देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत ई़डीने राऊतांची आठ दिवसांची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्य़ानंतर कोर्टाने चार दिवसांची कोठडी सुनावली.
संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नाहीत असा आरोप ईडीकडून करण्यात आला. म्हणूनच त्यांच्यावर रेड मारली गेली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने युक्तीवादात सांगितले. युक्तीवाद मांडत असताना ईडीने राऊतांवर आरोप केले. प्रवीण राऊत पत्राचाळ पुर्नविकासाचं काम पाहत होते. प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊतांना (संजय राऊत यांच्या पत्नी) १ कोटी रुपये पाठवले. प्रवीण राऊतांनी दिलेल्या पैशातून राऊतांनी अलिबाग येथे जमिन खरेदी केली.प्रवीण राऊत यांचा संबंध फक्त नावालाच होता. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराचा फायदा संजय राऊत यांना झाला आहे. सर्व व्यवहार संजय राऊत यांच्यावतीने करण्यात आले होते. प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते. प्रवीण राऊतांनी दिलेल्या पैशातून राऊतांनी जमीन खरेदी केली.असे आरोप करत ई़डीने राऊतांची आठ दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली.
गैरव्यवहारातील पैसे दादर आणि आलिबाग येथे गुंतवले गेले आहेत. राऊतांच्या सांगण्यावरूनच पैसे गुंतवले गेले असल्याचेही सांगण्यात आले. 2010 ते 2011 मध्ये संजय राऊत यांचे परदेशी दौरे बांधकाम व्यवसाईकांकडून फायनल केले गेले होते. याचा तपास सुरु असल्याचे ईडीने युक्तीवादात सांगितले. प्रवीण राऊतांकडून राऊतांना महिन्याला २ लाख रू. दिले जायचे.राऊत दोन साक्षीदारांना धमकावत होते असाही दावा केला आहे.
संजय राऊत यांचा युक्तीवाद
संजय राऊत यांची अटक राजकीय हेतून केली असल्याचा आरोप जेष्ठ वकिल अशोक मुंदरगी यांनी केला. त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे तर इतके दिवस कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी कोर्टाला विचारला. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राजकीय सूडापोटी आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रत सरकार ईडीचा वापर करत आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रवीण राऊत हे व्यापारी आहेत. संजय राऊत एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे आर्थिक उलाढाल करणाऱ्या कंपन्या आहेत. त्या उलाढालीतून त्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. राऊतांना कोठडी द्यायची असेल तर कमी वेळेची द्या अशी मागणी मुंदरगी यांनी केली. संजय राऊत यांना
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








