Sanjay Raut Devendra Fadnavis : शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे ( Roshni Shinde) यांना काल ठाण्यात जबर मारहाण केली.जखमी झालेल्या रोशनी शिंदे यांना काल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह हॉस्पिटलला भेट देऊन रोशनी शिंदे यांची विचारपूस केली.यानंतर आक्रमक शिवसेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान आज रोशनी शिंदे मारहाण प्रकऱणी ठाण्यात आज ठाकरे गटाने एल्गार पुकारल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मिंधे गटाच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप करत रोशनी शिंदेंची तब्येत बिघडल्याने त्यांनी लीलावती रूग्णालयात हलवलं अशी माहितीही त्यांनी दिली.
उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री यांचा उल्लेख फडतूस असा केला यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, फडतूस हा अतिशय सौम्य शब्द आहे.नागपुरात याचा अर्थ वेगळा असेल.जो काम चांगल करत नाही त्याला महाराष्ट्रात फडतूस हा शब्द वापरला जातो. हे सरकारचं बिनकामाचं आहे.फडतूस म्हणजे अर्थहीन अस स्पष्टीकरण राऊतांनी दिलं. तुम्ही भिजलेली काडतुसं आहात ज्याचा काही उपयोग नाही. सीबीआय आणि ईडी हे तुमचं काडतुस आहे. सीबीआय आणि ईडी बाजूला ठेवून या मग काढतुस कोठे घुसत ते आम्ही दाखवतो असा इशारा राऊतांनी दिला.
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृती शिंदे गटाने मोडून काढली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानं महाराष्ट्राला अडचण झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आहेत कोण? बानवकुळेंना तिकीट का नाकारलं ते विचारा अशी खोचक टीका केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








