Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमधील गोळीबीर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे. उध्दव ठाकरेंच्या टीकेवर ते काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून टीका केली आहे.देशाची न्यायव्यवस्था धोक्य़ात आहे. हे सरकार सत्ते आल्यापासून कायदा मानत नाही.खोट्या केसेस दाखल करून आवाज दाबला जातोय, अशी टिका राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलीय. 5 मार्चच्या उध्दव ठाकरेंच्या सभेचे चित्र स्पष्ट झालंय.कोकणातील जनता उध्दव ठाकरेंसोबत असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केलं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य़ आहे असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जनता कुणासोबत आहे हे निवडणुकीत स्पष्ट होईल. सरकार विरोधात बोलणं देशद्रोह नाही.किरण रिजीजूंचा न्यायालयावर दबाव आहे.ज्या पदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते. कायदामंत्री म्हणून त्या पदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या पदावर असणारे कायदा मंत्री धमकी देत आहेत यालाच हुकुमशाही म्हणातात. याविरोधात लढण्यासाठी लंडनमध्ये राहुल गांधी यांनी आवाज उठवला म्हणूनच लोकसभेचे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे सरकार सत्ते आल्यापासून संविधान आणि कायदा मानत नाही.न्यायव्यवस्था खिशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय
Previous Articleमहावीर महाविद्यालयात समाज कल्याणतर्फे उद्या ‘संविधान संवाद अभियान’ कार्यशाळेचे आयोजन
Next Article …तर आम्ही स्वबळावर लढू








