मी पुन्हा येणार अस म्हणत विरोधी पक्षनेते खरंच पुन्हा आले. काल शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील मविआ सरकार कोलमडले आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि फडणवीस आज संध्याकाळी शपथविधी घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या या सत्ताबदलावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. ‘आम्ही पुन्हा येणार’ असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांच्याच स्टाईलमध्ये भाजपाला इशारा दिला आहे.
काय म्हणाले संजय राऊत
शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आली आहे. हा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र आहे. आम्ही पुन्हा स्वबळावर काम करु आणि सत्तेत येऊ असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांची सागर बंगल्यातील बैठक झाल्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील, फडणवीस आणि शिंदे हे एकाच गाडीतून गेले आहेत.
Previous Articleशिवसेनेला भगवान शिवही वाचवू शकत नाही- कंगना राणावत
Next Article सलमान नंतर ‘या’ अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी









