Sanjay Raut On Ajit Pawar : गेल्या तीन ते चार दिवसापासून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील संघर्ष वारंवार समोर येत आहे.आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मी फक्त शरद पवारांचं ऐकतो. अजित पवार मला सांगू शकत नाहीत. सामना हे वृत्तपत्र नेहमीच खरे लिहतं. यात लपवण्यची काही गरज नाही, अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना दिली.
नेमकं काय घडलयं
रविवारी नागपुरात वज्रमुठच्या सभेवेळी सामनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून काय मिळालं हे रोखठोक राऊतांनी लिहलं होतं. त्यांच्या या लेखावर नाराजीची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती. संजय राऊतांना ही माहिती कोण दिलीयं माहित नाही. राऊत उगाचंच नाक खुपसत आहेत. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, ज्या पक्षाचे मुखपत्र आहात त्या बद्द्ल बोला, आमचं वकिलपत्र घेण्याचं काही काम नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, काल अजित पवार यांनी काल राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या मार्गदर्शखाली आम्ही राष्ट्रवादीत काम करत आहोत. यापुढेही करतच राहणार अस म्हणत काही लोक वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलं होतं. यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे की,मी फक्त शरद पवारांचं ऐकतो. कोणालाही घाबरत नाही. यामुळे पुन्हा हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. याचे राजकीय परिणाम पुन्हा पाहायला मिळू शकतात.
Previous Articleपहिला काजू महोत्सव ठरला अभूतपूर्व
Next Article जी20 प्रतिनिधींची पणजीतील जनऔषधी केंद्राला भेट








