इव्हीएम मशिन टेम्पर करण्याची टेक्नॉलॉजी इस्रायलकडून भाजपला मिळाल्याने तसेच पेगासस प्रकरणही इस्रायलच्या पाठींब्यावर झाल्याने भाजप आणि केंद्र सरकार इस्त्रायलची बाजू घेत असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तीव्र होतं असतानाच जागतिक नेत्यांनीही यायुद्धामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात आहे त्यामुळे जग दोन भगांमध्ये विभागला गेले आहे. भारतात केंद्र सरकारने इस्रायलच्या बाजूने भूमिका घेऊन आपला पाठींबा दर्शिवला आहे. तर विरोधी इंडिया आघाडीतील नेत्यांनी आपला पारंपारिक मित्र पॅलेस्टाईनला पाठींबा दिला आहे. इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भुमिका मांडली. त्यामुळे भाजपातील नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
दरम्यान आज संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेऊन इंडिया आघाडीच्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या भुमिकेवर टिका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना लक्ष केले. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “जगात काय चाललंय याची जाणीव लोकांना नाहीय. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा काँग्रेसचे सल्लागार होते. कोणाला हमासमध्ये पाठवयाचं आणि कोणाला अल कायदामध्ये हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत. आधी देशाला वाचवा. भाजपने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका समजून घेतली पाहीजे. नरेंद्र मोदींना विश्वगुरु बनवलं आहे, परंतु पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयीपर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात देशाची एकच भूमिका राहिली आहे. सरकारे बदलली पण भूमिका बदलली नाही.” असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पुढ बोलताना ते म्हणाले, “इव्हीएम मशिन टेम्पर करण्याची टेक्नॉलॉजी इस्रायलकडून मिळाली आहे. पेगासस तुम्हाला इस्रायलकडून मिळालं आहे, म्हणून तुम्ही इस्रायलच्या पाठीशी आहात.” असा गंभीर आरोपही करताना “अशा खूप साऱ्या गोष्टी इस्रायलकडून तुम्हाला मिळाल्या आहेत. आम्ही इस्रायल विरोधात नाही. पण या संघर्षाबाबत नेहरूंपासून अटल बिहारी वाजयेपींपर्यंत एक भूमिका असून त्याचा अभ्यास देवेंद्र फडणवीसांनी करावा.” असा सल्लाही संजय राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री वेडे झाले असून त्यांच्यावर बोलणंही योग्य नाही. त्यांनी देशाला आणि इतिहासाला समजून घेतले पाहीजे.आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एके काळी काँग्रेसचं मीठ खाललं आहे. गाझावर हल्ला झाल्यावर जो बायडेन तेल अवीवमध्ये बसून पाहत होते, ही कोणती मानवता आहे? ” असा प्रश्नही त्यांनी विचारून अमेरीकेच्या भुमिकेवर नाराजी दर्शविली.








