वेंगुर्ले (वार्ताहर)-
“भगवद भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या नुतन कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी वेंगुर्लेचे संजय पुनाळेकर यांची तर कार्यवाहपदी दिनकर प्रभू-केळूसकर आणि खजिनदारपदी किरण पारकर यांची एकमताने निवड करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हयातील सुमारे १५० कीर्तनकार सभासद असलेल्या ‘भगवद भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या नुतन कार्यकारीणी निवडी संदर्भात आयोजित करण्यात आलेली सभा हंगामी अध्यक्ष किशोर राणे यांच्या अध्यक्षतेखाली पिंगुळी राऊळ महाराज मठ येथील दत्तमंदिरात संपन्न झाली.
यापूर्वी या संस्थेवर अध्यक्ष म्हणून ह.भ.प. श्रीराम झारापकर आणि उपाध्यक्ष म्हणून ह.भ.प. दीपक नेवगी यांनी काम पाहीले होते. परंतु त्यांच्या निधनानंतर ही पदे रिक्त झाली होती. परंतु आता कार्यकारीणीची मुदत संपल्याने निधनानंतर ही पदे रिक्त झाली होती. परंतु आता कार्यकारीणीची मुदत संपल्याने नविन कार्यकारीणी स्थापन करणेत आली. या सभेत १५ सदस्यांच्या संचालक मंडळ कार्यकारीणीची निवड करण्या करीता उपस्थित सदस्यांतून सर्व प्रथम सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व भागातून १५ सदस्यांची निवड करणेत आली. तदनंतर या सदस्यांमधून पदाधिकाऱ्यांची निवड करणेत आली.
यामध्ये अध्यक्षपदी संजय पुनाळेकर, (वेंगुर्ले) उपाध्यक्षपदी श्री. काजरेकर, (घोटगे-जांभवडे), कार्यवाहपदी दिनकर प्रभू-केळूसकर (केळूस), खजिनदारपदी किरण पारकर (आंब्रड) यांची निवड करणेत आली. उर्वरित कार्यकारिणी सदस्य- प्रशांत धोंड— (पिंगुळी), शेखर पाडगांवकर (मळगांव), सुधीर जडीये (सांगेली), रामचंद्र मेस्त्री (कालेली), किशोर राणे (जानवली), पद्मनाभ पटक (ओरोस), महेश बोवलेकर (मठ), अवधूत नाईक (खानोली-वायंगणी), सदाशिव पाटील, (आंदुर्ले), सौ. केतकी सावंत (पोखरण), सौ. श्रध्दा, ठाकूर (म्हापण) यांचा समावेश आहे.
नवनवीन किर्तनकार निर्मीती बरोबरच किर्तनाचा प्रसार व प्रचाराचे काम प्रामाणिपणे करेन- संजय पुनाळेकरकिर्तन विद्यालयातून नव-नवीन किर्तनकार निर्माण करणे त्याचप्रमाणे किर्तनाचा प्रसार आणि प्रचार समाजामध्ये वाढविणे ही सर्व कामे नविन कार्यकारीणीच्या सहकार्याने पुढे जोमाने चालू राहील. असे प्रतिपादन भगवद भक्ती प्रबोधनी, सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित अध्यक्ष ह.भ.प. संजय पुनाळेकर यांनी नूतन कार्यकारीणीवर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.या बैठकित प्रास्ताविक किशोर राणे यांनी तर शेवटी आभार कार्यवाह दिनकर प्रभू-केळूसकर यांनी मानले.