Sanjay Mandlik On Satej Patil, Dhananjay Mahadik : लोकसभा निवडणुकीवरून कोल्हापुरात राजकारण चांगलचं तापलं आहे.त्यातच खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून सध्य़ा कोल्हापुरात चर्चा रंगली आहे.याबाबत महाविकास आघाडी संपर्कात असल्य़ाचे बोलले जात आहेत. माजी गृहमंत्री, काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणूकीबाबत आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. याशिवाय कोल्हापुरात मोठा धमाका होणार आहे. काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यसेफोट धनंजय महाडिक यांनी केला आहे. दरम्यान, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केलीय.
बातमी दिशाभूल करणारी आहे.विद्यमान खासदर आहेत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार हे ठरले आहे.पुढची निवडणूक शिवसेनेतुनच लढवणार असल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीचा कोणताही संपर्क माझ्याशी झालेला नासल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि शिंदे गट जोमाने काम करतोय.एकजीनसिपणाने काम करत असताना चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात.लोकसभेच्या निवडणूक आधी सर्व पाक्षाची तयारी सुरु आहे.चर्चा अजून प्राथमिक पातळीवर आहेत.जागांची अदलाबादल निवडणूक काळात होते. बारामतीचे ज्योतिषी त्या काळात भरपूर फिरत होते.आताही फिरत असतील.काँग्रेसचे कोण नेते मला फोन करतात मला माहिती नाही. 2019 पासून आतापर्यंत भरपूर पुलाखालून पाणी गेले आहे.धनंजय महाडिक आणि भाजप सगळेच माझा प्रचार करतील.ते माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत. बारामतीचे ज्योतिष कोल्हापुरात आहेत काय? त्यामुळेच अशा वावड्या उठत आहेत. शिवसेना आणि भाजपला एकत्रित काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.








