आज रामनवमी… श्रीराम भक्तीचे श्रद्धास्थान…या श्रद्धास्थानी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक लीन झाले. स्व. विक्रमसिंह घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या कागलच्या भव्य राम मंदिरात आज संजय मंडलिक यांनी रामनवमीनिमित्त रामाचे दर्शन घेऊन विजयाचा आशीर्वाद मागत त्यांनी श्रीराम जन्म सोहळा आणि महाआरतीत सहभाग घेतला.
यावेळी त्यांच्या समवेत समरजितसिंह घाटगे, प्रवीणराजे घाटगे, राजेंद्र जाधव, बॉबी माने, सतीश पाटील, रमेश माळी, युवराज पसारे, ईगल प्रभावळकर, महेश घाटगे, सुधीर पाटोळे यांच्यासह रामभक्त उपस्थित होते.
दरम्यान, संजय मंडलिक यांनी कोल्हापूर मधील रविवार पेठ येथील दिलबहार तालीम मंडळाच्यावतीने आयोजित राम लल्लाच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्यातील सर्व रामभक्तांनी खासदार मंडलिक यांच्या या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले.
मंगळवार पेठेमध्ये राम मंदिरात रामजन्म सोहळ्याची तयारी चालू असताना खासदार संजय मंडलिक यांनी रामप्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील, सुरेश कुराडे यांच्यासह सदानंद उर्फ पपू सुर्वे, विनायक सासणे, रोहित उर्फ बंडा सावेकर, रणजीत सासणे, किरण रणदिवे, दिनकर होगाडे इत्यादी अबालवृद्ध रामभक्त उपस्थित होते.
बाबा जरगनगर येथे अक्कलकोट स्वामी समर्थनगर स्वामी समर्थ मंदिरामधील महाप्रसाद वाटपामध्ये खासदार संजय मंडलिक काही काळ रामभक्तांना प्रसाद वाटप केले. सलग 27 व्या वर्षीच्या महाप्रसाद वाटप उपक्रमावेळी प्रशांत पवार, गजानन पवार, प्रमोद पवार, अवधूत पवार, पार्थ पवार, प्रभावती पवार, धरणगावकर मॅडम यांच्यासह अबालवृद्ध रामभक्त उपस्थित होते.
मोठ्यांचे मोठेपण…
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आपल्या सहक्रायांसह श्रीराम मंदिराच्या गाभ्रायात उभे असताना मालोजी छत्रपती यांचे श्रीराम मंदिरात आगमन झाले. यावेळी संजय मंडलिक यांना मानाचा नारळ देऊ केला. पण सुसंस्कारित संजय मंडलिक यांनी पाहुणे म्हणून आलेल्या मालोजीराजांच्या हाती हा नारळ द्यावा अशी पुज्रायांना विनंती केली. त्यावर मालोजीराजे यांनीही संजय मंडलिक यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत हा नारळ मंडलिकांच्याकडे द्यावा असे सांगितले. त्यानंतर पुज्रायांनी तो संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केला.









