टेंभुर्णी प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या माढा लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख पदाचा तडका-फडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याने राजकिय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, संजय कोकाटे यांचा माढा लोकसभा मतदारसंघाचा संपर्क दौरा सुरू असताना ते मोडनिंब येथे पोहचले होते. तेथे सकल मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू असल्याने कोकाटे तेथे पाठींबा देण्यासाठी गेले असता ‘पदाधिककाऱ्यांना प्रवेश बंदी’ असल्याचे सांगून येथे येण्यास त्यांना तीव्र विरोध करण्यात आला. यायचेच असेल तर राजीनामा देऊन या असे बजावण्यात आले. यावर संजय कोकाटे यांनी क्षणाचाही विलंब न करता संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या समाजाची मुले शिक्षण असून ही दिशाहीन होत असतील तर पदाचा काय उपयोग आहे. मला समाजाचे देणेघेणे आहे.त्याच्याबरोबर राहावयाचे आहे अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली आहे. यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने संजय कोकाटे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.









