सावंतवाडी / प्रतिनिधी
Sanjay Iyer’s hunger strike suspended!
जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या योजनेच्या वादाबाबत ग्रामपंचायत वाफोली सर्व ग्रामपंचायत सदस्य व तक्रारदार संजय आईर व वाफोली तंटामुक्ती अध्यक्ष व विद्यमान सदस्य मंथन गवस, वाफोली पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक झाली, योजनेतील वादाग्रस्त वेगवेळ्या विषयावर विस्तृत चर्चा झाली .सर्वाना विश्वासात घेऊन योजना मार्गी लावण्याबाबत एकमत झाले.. या पुढे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून पुढे पाऊल टाकू.. असे ग्रामपंचायती कडून सांगण्यात आल्याने दिनांक 10 एप्रिल रोजी वाफोली ग्रामपंचायती समोर हिणारे तीन संजय आईर व तीन सदस्य यांचे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले.
वाफोली ग्रामसेवक प्रसाद ठाकूर म्हणाले जल जीवन मिशन योजने चा प्रस्ताव पूर्वीची ग्रामपंचायत बॉडी असताना माझ्या सहीने गेला आहे त्यामुळे योजना राबविताना बोगस काम होणार नाही . सर्व सदस्य व तक्रारदार यांना या पुढे विश्वासात घेऊन एक जुटीने योजना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले यापुढे कसलेहि विकास काम असो इतर कामे सर्वाना विश्वासात घेऊन व चर्चा कामे केली जातील असे ग्रामपंचायतीचा अधिकारी या नात्याने मी आपल्याला ग्वाही देतो असे ही सांगितले.









