बीएसएस अत्याधुनिक सेंसरनी युक्त : सैन्याच्या सामर्थ्यात मोठी भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी नवी दिल्लीच्या साउथ ब्लॉक येथून ‘संजय’ बॅटलफील्ड सर्व्हिलान्स सिस्टीम’ला (बीएसएस) हिरवा झेंडा दाखविला आहे. संजय एक स्वयंचलित प्रणाली असून ती सर्व जमिनीवरील आणि हवाई युद्धक्षेत्र सेंसर्सकडून इनपूट्सना एकीकृत करणार आहे. युद्धक्षेत्राची पारदर्शकता वाढवत ही प्रणाली केंद्रीकृत वेब अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भविष्यातील युद्धक्षेत्राचे स्वरुप बदलणार आहे. सैन्य मुख्यालय आणि भारतीय सैन्य निर्णय समर्थन प्रणालीला याच्याकडून इनपूट प्रदान केले जातील.
बीएसएस अत्याधुनिक सेंसर आणि अॅनालिटिक्सने युक्त आहे. ही विशाल भूमी सीमांवर देखरेख करेल, घुसखोरी रोखेल, गुप्तचर आणि टेहळणीकार्यात शक्ती वाढविणार आहे. कमांडर्सना नेटवर्क केंद्रीत वातावरणात पारंपरिक आणि उप-पारंपरिक दोन्ही अभियानांमध्ये काम करण्यास ही प्रणाली सक्षम करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकानुसार भारतीय सैन्यात या प्रणालीचा समावेश डाटा आणि नेटवर्कच्या दिशेने एक असाधारण झेप आहे.
‘संजय’ला भारतीय सैन्य आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेकडून स्वदेशी अणि संयुक्त स्वरुपात विकसित करण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या ईयर ऑफ टेक्नॉलॉजी एब्जॉप्शनमध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रणालींना मार्च ते ऑक्टोबर 2025 पर्यंत तीन टप्प्यांमध्ये भारतीय सैन्याच्या सर्व ऑपरेशनल ब्रिगेड, डिव्हिजन्स आणि कोरमध्ये सामील करण्यात येणार आहे. ही प्रणाली 2,402 कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
संजय बीएसएस प्रणाली सैन्यदलात सामील करण्याच्या कार्यक्रमात संरक्षणराज्यमंत्री संजय सेठ, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि संरक्षण मंत्रालय तसेच बीईएलचे वरिष्ठ अधिकारी सामील झाले.









