नागरिकांचे हाल
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे . त्यामुळे गेले तीन दिवस सावंतवाडीत नियमित होणारे कचरा संकलन बंद आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. केवळ नियमित कर्मचारी कामावर असून त्यांच्याकरवी काम सुरु आहे. मात्र, अनेक भागातील कचरा तसाच पडून असल्याने शहरात अस्वच्छतेसह दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप केव्हा मिटतो, याच्या प्रतीक्षेत समस्त नागरिक आहेत . त्यामुळे पालिकेने पर्यायी सोय करावी, अशी मागणी होत आहे.









