लोकमान्य मॅरेथॉनचा ऐतिहासिक शुभारंभ!
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व एनजीओ लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मॅरेथॉन 2025 या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे आयोजन आज रविवारी सकाळी 6:30 वाजता, आरपीडी कॉलेज मैदानावर, करण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ धावण्याची नाही, तर फिटनेस, शिक्षण, आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणारे एक अद्वितीय व्यासपीठ हे. या मॅरेथॉनसाठी भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
मॅरेथॉनसाठीचा मार्ग
►10 किमी मॅरेथॉन मार्ग: आरपीडी कॉलेज ग्राउंडपासून सुरू होऊन गोअवेस सर्कल, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिज, मिलिटरी महादेव, पॉप इन, 1 ला रेल्वे गेट, 2 रा रेल्वे गेट, 3 रा रेल्वे गेट, डी मार्ट, उत्सव सर्कल मार्गे परत त्याच मार्गाने आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे समाप्त होईल.
►5 किमी मॅरेथॉन मार्ग: आरपीडी कॉलेज ग्राउंडपासून सुरू होऊन गोवावेस सर्कल, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिज, मिलिटरी महादेव, पॉप इन, नानावडी क्रॉस मार्गे परत त्याच मार्गाने आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे समाप्त होईल.
►3 किमी मॅरेथॉन मार्ग: आरपीडी
कॉलेज ग्राउंडपासून सुरू होऊन गोवावेस सर्कल, मराठा मंदिर मार्गे परत आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे समाप्त होईल.
पाणीपुरवठा आणि वैद्यकीय केंद्रे
►1.आरपीडी कॉलेज ग्राउंड, 2.प्रथम बिल्डिंग, 3.मराठा मंदिर, 4.मिलिटरी महादेव/पॉप इन्, 5.लोकमान्य
मॅरीगोल्ड 6.तिसरा रेल्वे गेट, 7.उत्सव सर्कल सर्व स्पर्धक सहभागींच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी मॅरेथॉनच्या मार्गामध्ये पाणीपुरवठा , वैद्यकीय केंद्र आणि
आरपीडी कॉलेज ग्राउंड ,मराठा मंदिर,मिलिटरी महादेव / पॉप इन् आणि उत्सव सर्कल अशा 4 ठिकाणी ऊग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांच्या मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी 77959 72635 , 86180 34063 , 81233 74824 या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.









