प्रतिनिधी/ पणजी
भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने रविवारी तिची खेळाडू म्हणून वाटचाल जिथून सुरू झाली होती तिथेच संपवली. यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी तिने टेनिसचा निरोप घेतला. रोहन बोपण्णा, युवराज सिंग आणि तिची मैत्रीण बेथानी मेटेक सँड्स यांच्यासमवेत प्रदर्शनीय सामन्यांमध्ये खेळून सानियाने अखेरीस लाल बहादूर टेनिस स्टेडियमवर तिच्या शानदार कारकिर्दीचा समारोप केला,
सुमारे दोन दशकांपूर्वी डब्ल्यूटीए एकेरी विजेतेपद जिंकून तिने येथूनच एका मोठ्या मंचावर आपले आगमन झाल्याचे संकेत दिले होते. रविवारी या प्रदर्शनीय खेळला केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझऊद्दीन यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावली. एका लाल कारमधून कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर, 36 वषीय सानियाचे स्वागत चाहत्यांनी जोरात केले. यात मान्यवरांचाही समावेश होता.
निरोप देताना भावूक झालेल्या सानियाने 20 वर्षे देशासाठी खेळणे हा तिच्यासाठी सर्वांत मोठा सन्मान असल्याचे सांगितले. याप्रसंगी सहा वेळा ग्र?डस्ल?म विजेती (महिला दुहेरीत तीन आणि मिश्र्र दुहेरीत तीन) ठरलेली सानिया दोन मिश्र्र दुहेरीचे प्रदर्शनीय सामने खेळली आणि ते दोन्ही तिने जिंकले.
ज्या ठिकाणी तिने काही संस्मरणीय किताब जिंकले तेथे ’सेलिब्र्रेटिंग द लेगसी ऑफ सानिया मिर्झा’सारखे फलक घेऊन चाहते आल्याने महोत्सवाचे स्वरूप आले होते. काही चाहत्यांनी ’आठवणींसाठी धन्यवाद’ आणि ’आम्हाला तुझी आठवण येईल, सानिया’ असे फलक हातात घेतले होते. तिने मैदानात प्रवेश केल्यावर प्रेक्षकांनी, बहुतेक शाळकरी मुलांनी जल्लोष केला. सामन्यापूर्वी बोलताना ती म्हणाली, ’तुम्हा सर्वांसमोर माझा शेवटचा सामना खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’
मी हैदराबादला सानिया मिर्झाच्या टेनिषच्या निरोपासाठी आलो आहे. यासाठी खूप लोक आले आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. सानिया मिर्झा ही केवळ भारतीय टेनिससाठीच नाही, तर भारतीय खेळांसाठीही एक प्रेरणा आहे’, असे रिजिजू म्हणाले.
सामन्यानंतर सानियाचा तेलंगणचे मंत्री के. टी. रामाराव आणि तेलंगणचे क्रीडामंत्री व्ही. श्रीनिवास गौड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माझ्यासाठी 20 वर्षे माझ्या देशासाठी खेळणे हा सर्वांत मोठा सन्मान आहे. आपल्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी ते करू शकले, असे सांगून आपल्या प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे सानियाने आभार मानले चाहत्यांनी यावेळी तिचा जयजयकार केला असता सानिया भावूक झाली









