गोकुळ शिरगाव, प्रतिनिधी
Kolhapur Crime News : सांगवडेवाडी(ता.करवीर) येथे परप्रांतीयाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अनुराग राजेश कुशवाह (वय- १९) सध्या रा.हलसवडे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगवडेवाडी येथील ज्योतीराम दत्तू चव्हाण यांच्या शिवचा मळा येथील शेतातील विहिरीत एका परप्रांतीयाचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. गावकऱ्यांना याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस तपासात या परप्रांतीयाचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शी समोर आलयं.
औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगार अनुराग कुशवाह हा जगदीश साळुंखे यांच्या घरी भाड्याने राहत होता. त्याचे मूळगाव भैस्की पो.सैदाबाद ता.हंडीया जि.प्रयागराज उत्तर प्रदेश) आहे. या युवकाचा १० मे रोजी पहाटेच्या सुमारास गळा आवळून खून करण्यात आला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी खून केल्यानंतर सांगवडेवाडी विहिरीत टाकण्यात आला. संशयित आरोपी सौरभ बाबुराव पाटील (वय -२१ ),संग्राम सदाशिव जाधव (वय- २६), दोघे रा.शिरपेवाडी ता.चिकोडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला गोकुळ शिरगाव पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास या ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.
Previous Articleमळेवाड येथे अपघात रोखण्यासाठी बसविला बहिर्वक्र आरसा !
Next Article बालक-गर्भवती दूध पावडरपासून वंचित









