वृत्तसंस्था/ बिलिसी (जॉर्जिया)
भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल संग्राम सिंगने मिक्स मार्शल आर्ट्स (एमएमए) मध्ये नवा इतिहास घडविला. त्याने या क्रीडा प्रकारात पदार्पणातच लढत जिंकली.
येथे झालेल्या अंतिम लढतीत संग्राम सिंगने केवळ दीड मिनिटांच्या कालावधीत पाकचा मल्ल अली रझा नासिरचा पराभव केला. संग्राम सिंगच्या तुलनेत पाकचा अली रझा नासिर 17 वर्षांनी वयाने लहान आहे. 93 किलो वजन गटामध्ये कमी कालावधीत विजेतेपद मिळविण्याचा पराक्रम संग्राम सिंगने केला असून एमएमए लढत जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष मल्ल ठरला आहे.









