सांगली : इन्फोसिस फाऊंडेशनच्या (infosys foundation) माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांच्या सामाजिक कार्याने जसे लोकांना आपलेसे केले, तीच जादू त्यांच्या लेखनानेही साध्य केली. अनेक बोधकथा, मिथक कथा आणि इतर साहित्याच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी वाचकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. आपल्या वाचकांशी संवाद साधण्यासाठी सुधा मूर्ती ७ नोव्हेंबर रोजी सांगलीकरांच्या भेटीस येत आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह (Vishnudas Bhave Natyagruha) येथे संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल.
इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधा मूर्ती यांनी देवदासी कल्याणाचे काम सुरू केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आवाका पुढे वाढतच गेला. सोबतच त्यांच्या विविध क्षेत्रातील अनुभवांवर आधारित लेखनानेही वाचकांचा मने जिंकली. मेहता पब्लिशिगं हाऊसतर्फे आजवर त्यांची २३ पुस्तके मराठी अनुवादाच्या रूपात प्रकाशित झाली आहेत. ‘आजीच्या पोतडीतील गोष्टी’तल्या हलक्याफुलक्या रंजक गोष्टी असोत, वा ‘पितृऋण’ आणि ‘अस्तित्व’सारख्या कौटुंबिक मूल्यांची रूजवण करणाऱ्या कादंबऱ्या त्यांच्या गोष्टींनी सतत माणुसकीचा बोध दिला. नुकतीच त्यांनी मिथक कथांच्या पाच पुस्तकांची मालिकाही पूर्ण केली आहे. या सर्व पुस्तकांच्या एकत्रित संच सुधा मूर्ती यांच्या हस्ते हस्तांतरित होत आहे.
यापूर्वी २००४ मध्ये सुधा मूर्ती यांच्या ‘गोष्टी माणसांच्या’ पुस्तकाचे सांगली येथे प्रकाशन झाले होते. त्यामुळे तब्बल दीड दशकाच्या कालावधीनंतर सुधा मूर्ती पुन्हा वाचकांच्या भेटीस येत आहेत. या कार्यक्रमात सुधा मूर्ती त्यांचा लेखन प्रवास मांडतील. शिवाय उपस्थित वाचकांनाही त्यांच्याशी संवाद साधता येईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








