जिल्हा प्रशासनाने जाहीर केले हे संपर्क क्रमांक
सांगली / प्रतिनिधी
सुदानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अडकलेले ८० ते १०० नागरिक सुखरूप आहेत. ते राहणारे ठिकाण युध्दजन्य क्षेत्रापासून ४०० कि.मी दूर अंतरावर सुरक्षित भागात आहे.असे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले असून परराष्ट्र मंत्रालय आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य क्रमांक जाहीर केले आहेत. भारतात परतण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयास संपर्क केला असता परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन क्रमांक १८००११८७९७ (टोल फ्री), मो.क्र. ९९६८२९१९८८ प्रसिध्द केला असून याबाबत सुदान मधील नागरिकांनी या ठिकाणी संपर्क केला असता त्यांना परराष्ट्र मंत्रालयाकडून सहकार्य मिळत आहे असे कळविण्यात आलेले आहे. त्याचबरोबर स्थानिक सहकार्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली फोन क्र. ०२३३- २६००५०० / टोल फ्री क्र. १०७७ वरती संपर्क करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.








