जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील येळवी येथे २२ वर्षीय तरुणाने सोशल मिडियावर स्वतःचा फोटो टाकत भावपुर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत शेतातील घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, येळवी येथील २२ वर्षीय औदुंबर विजय जगताप याचे घर येळवी गावापासून काही अंतरावर आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता औदुंबर जगताप याने स्वतःच्या व्हाट्स अपला स्वतःचा फोटो स्टेटसला ठेवला. स्टेटस ठेवल्यानंतर काही वेळानंतर त्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.








