कोकरूड वार्ताहर
पणुंब्रे वारुण, ता. शिराळा येथील चांदोली मुख्य रस्त्यावरील पुलाच्या संरक्षक भिंतीला मोटार सायकल धडकून झालेल्या अपघातात उदगीरी ता.शाहूवाडी येथील युवक सागर लक्षण पाटील जाग्यावरच ठार झाला असून घटनेची नोंद कोकरूड पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद प्रल्हाद नामदेव धामणकर यांनी दिली आहे.
कोकरूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उदगीरी ता.शाहूवाडी येथील युवक सागर लक्षण पाटील (वय २१) हा बुधवार दि.४ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल क्र. एम.एच. ०९ एफ के १५८१ या होंडा कंपनीच्या होरनेट मोटार सायकल वरून रात्री उशिरा घरी निघाला होता.त्याच्या बरोबर एक मित्रही होता. शेडगेवाडी-चांदोली रोडवर पणुंब्रेफाटा येथील वळणावरील पुलावर आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सूटल्याने पुलावरील तटरक्षक भिंतीला जोराची धडक बसली यामध्ये त्याच्या डोक्यास जोराचा मार लागुन गंभीर जखमी झाल्याने मयत झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील करत आहेत.








