भारत गौरव रेल्वेतून दक्षिण, पश्चिम आणि मध्य रेल्वे विभागात सफर
मिरज प्रतिनिधी
दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाकडून यशवंतपूर-बनारस भारत गौरव एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस गुऊवारी 30 ऑगस्ट रोजी मिरज जंक्शनवर येणार आहे. या भारत गौरव रेल्वेतून दक्षिण, पश्चिम आणि मध्य रेल्वे विभागात प्रवाशांना पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी सफर करता येणार आहे. सांगली, मिरज भागातील प्रवाशांना बनारसलाही जाता येणार आहे.
रेल्वेच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी भारत सरकारने एक भारत, श्रेष्ठ भारत, बघा आपला देश या अभिनव उपक्रमांतर्गत दक्षिण-पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर भारत गौरव एक्सप्रेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतपूरहून बनारस असा प्रवास करणारी पहिली भारत गौरव एक्सप्रेस ट्रायल तत्वावर 29 रोजी सोडण्यात येणार आहे. ही गाडी 30 ऑगस्ट रोजी मिरज जंक्शनमार्गे पुणे, दौंड कॉर्ड लाइन, मनमाड, भुसावळ आणि खंडवा स्थानकावऊन प्रवास करणार आहे.
यशवंतपूर-बनारस-यशवंतपूर भारत गौरव एक्सप्रेस (गाडी क्र. 06553) मंगळवारी सकाळी दहा वाजता यशवंतपूरहून प्रस्थान केले आहे. ही गाडी दक्षिण-पश्चिम रेल्वेम मार्गावऊन मध्य रेल्वेच्या मिरज जंक्शनवर गुरूवारी 30 ऑगस्ट रोजी पोहचेल. मिरजमार्गे पुणे, दौंड कॉर्ड लाइन, मनमाड, भुसावल आणि खंडवा या स्थानकांवर थांबेल. तिथून ही गाडी बनारसकडे प्रस्थान करेल. 5 सप्टेंबर रोजी पश्चिम मध्य रेल्वे मार्गावऊन खंडवा, भुसावल, मनमाड, दौंड कॉर्ड लाइन, पुणे आणि मिरज असा परतीचा प्रवास कऊन पुन्हा यशवंतपूरकडे रवाना होईल. या एक्सप्रेसला एलएचबी रॅकचे 11, वातानुकूलित 3-टियर, 1 भोजनयान आणि 2 जेनरेटर कार अशा बोगी जोडण्यात आल्या आहेत.








