सांगली / प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहे. शिंदे सरकारने खातेवाटप केल्याने निदान उद्या खातेनिहाय मंत्र्यांच्य़ा हस्ते ध्वजारोहण होईल असे ते म्हणाले, सांगलीत एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
“स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी खाते असणारे मंत्री झेंडावंदन करतील याचं समाधान आहे. खात्यासहित मंत्री आता महाराष्ट्रातील समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध झालेत याबद्दल शिंदे सरकारचे आभारच मानले पाहिजेत” असे म्हणून “एकनाथ शिंदे यांनी किती जणांची मने सांभाळायची. आता एकनाथ शिंदे यांना शिंदे गटातील नाराज असलेल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे” अशी ही असा टोला त्यांनी लगावला.
‘शिवसंग्राम’चे नेते विनायक मेटे यांच्य़ा अपघाती मृत्युबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले,”एक चळवळ करणारा, महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांची जाण असणारा, आणि मराठा समाजासाठी नेहमी आग्रही असणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे”